उपेंद्र कुशवाह एनडीएला ठोकू शकतात रामराम !

0

पाटना-राष्ट्रीय लोक समता परतीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएला सोडचिट्टी देऊ शकतात. आज एनडीएची बैठक होत आहे त्यात उपेंद्र कुशवाह सहभागी होणार नाही. दुपारी २ वाजेनंतर ते एनडीए सोडण्याची घोषणा करू शकतात. यामुळे बिहारमधील राजकीय समीकरण बदलू शकते.

गेल्या काही दिवसांपासून कुशवाह भाजप व भाजपशी संबंधित पक्षावर आरोप करत आहे. बिहारचे मुखमंत्री नितीश कुमार यांच्यावर देखील ते सातत्याने आरोप करीत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत दोन पेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यामुळे ते नाराज आहे. दुसरीकडे भाजपने जदयू सोबत बरोबरीने जागा वाटप करून लढण्यावर सहमती दिली आहे. याच्यावरून कुशवाह नाराज आहे.