शरद यादव यांच्या वक्तव्यामुळे समस्त महिला वर्गाचा अपमान-वसुंधरा राजे

0

जयपूर – माजी केंद्रीय मंत्रीशरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावक वादग्रस्त विधान केले. राजस्थानच्या अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी वसुंधरा राजे जाड झाल्या आहेत आणि त्यांना आता आराम द्यायला हवा. दरम्यान, वसुंधरा राजे मध्य प्रदेशची कन्या असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते. शरद यादव यांचे हे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान वसुंधरा राजे यांनी पलटवार केला आहे.

शरद यादव यांच्या विधानामुळे मी स्तब्ध झाले आहे. एवढा मोठा नेता आपल्या जीभेवर संयम ठेऊ शकला नाही तर त्याचे वाईट वाटते. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. त्यांच्या विधानामुळे माझा अपमान झाला आहे. खरंतर हा महिलावर्गाचा अपमान आहे. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान, झालरापाटन येथे वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना शरद यादव यांच्या टीकेला उत्तर दिले.