मुंबई : ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर भारतीय क्रिकेट संघातील हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुलने हजेरी लावली. यावेळी हार्दिक पांड्याने वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. दरम्यान आपल्या वक्तव्यावरून पांड्याने माफी मागितली आहे.
करणने या दोघांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले असता हार्दिकने कुटुंबीय खुलेपणाने माझ्या सेक्स लाइफबद्दल चर्चा करतात असे उत्तर दिले. ”एकदा आई-बाबांबरोबर एका पार्टीला गेलो होतो तेव्हा तेथे उपस्थित कोणत्या मुलीबरोबर शरीर संबंध झाल्याचे त्यांनी मला विचारले. त्यावेळी मी अनेकींकडे बोट दाखवले. आपले कौमार्य गमावल्याबद्दलही मी पालकांना अगदी कूलपणे सांगितले. मी घरी आल्यावर पालकांना ‘आज मी सेक्स करुन आलो आहे असे सांगतो’. असे पांड्या बोलला होता.
पांड्याच्या या बिनधास्त वक्तव्यावर चांगलीच टीका झाली. पांड्याने आज बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली.