मुंबई – मनसेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या लढाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी अखेरपर्यंत उभी आहे, अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजता कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी संपकरी बेस्ट कर्मचारी राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा. ✊
उद्या दि. १० जानेवारी २०१९ रोजी, सकाळी ११.०० वा. सर्व बेस्ट कर्मचारी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना भेटण्याकरिता कृष्णकुंज येथे जाणार आहेत. #कामगारांचीमनसे pic.twitter.com/SCvzFNqzPt
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 9, 2019