जयपूर-देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. काल मध्य प्रदेशमध्ये मतदान झाले. दरम्यान पुढील महिन्यात राजस्थानसाठी मतदान असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप होत आहे. दरम्यान कॉंग्रेसने निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. यात शेतकरी, महिला यांचे प्रश्न अग्रस्थानी असल्याचे दिसून येते. शेती कर्जाच्या सवलतव्यतिरिक्त, महिला आणि मुलींसाठी विनामूल्य शिक्षण देण्याचे वचन दिले आहे.
शेती अवजारांना गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी)मधून वगळण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. पारंपारिक शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कॉंग्रेस सत्तेत आल्यास पत्रकार संरक्षण कायदा करणार आहे असे आश्वासन कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी दिले. पहिल्याच मंत्रीमंडळबैठकीत याची घोषण केली जाईल असेही सांगण्यात येत आहे.