वन-डे मालिकेत बुमराला विश्रांती !

0

मुंबई : भारतीय संघाने ७२ वर्षानंतर पहिल्यांदाच ला ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत नमवले आहे. या मालिकेत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराला आगामी वनडे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. मे महिन्यापासून सुरू होणारी वर्ल्ड कप स्पर्धा आणि त्यापूर्वी होणारी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) यामुळे बुमरावर येणारा ताण लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ पाच वन-डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. भारतीय संघाने २-१ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केले. या मालिकेत बुमराने सर्वाधिक २१ विकेट घेतल्या आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ यापूर्वीच जाहीर केला होता. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी सिद्धार्श कौलला पाचारण करण्यात आले आहे.