एनआयएने मोठा कट उधळला; १६ ठिकाणी छापे टाकत स्फोटके जप्त

0

नवी दिल्ली-राष्ट्रीय तपास संस्थे एनआयएला दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील विविध १६ ठिकाणी छापे टाकून आयसिस या दहशतवादी संघटनेकडून रचण्यात मोठा कट उधळण्यात यश आले आहे. याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केल्याचा दावा केला जात आहे.

दिल्लीतील जाफराबाद आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली. या छाप्यात आयसिसचे नवे मॉड्यूल हरकत-उल-हर्ब-इस्लामचा खुलासा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.