नवी दिल्ली: आयएसआयशी संबंध असल्याच्या संशयावरून हैदराबादमध्ये तीन तर वर्धा येथील एका ठिकाणी एनआयएच्या पथकाने आज सकाळी छापे टाकले. वर्धा येथील मसाळा परिसरातून तपास यंत्रणांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
एनआयएच्या पथकाने आज सकाळी हैदराबादमध्ये तीन ठिकाणी तर वर्धा येथे मसाळा परिसरात छापा टाकला. आयएसआयशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने ही कारवाई केल्या समोर येत आहे. या तपास यंत्रणेच्या पथकाने या चार ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली असून या कारवाईबाबत एनआयएने अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र वर्ध्याहून महिलेला का ताब्यात घेण्यात आले.