स्व.निखील खडसेंना मुक्ताईनगरात आदरांजली

0
मुक्ताईनगर- स्व.निखील एकनाथराव खडसे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त निखील खडसे कॉम्प्युटर अकॅडमीत आदरांजली वाहण्यात आली. भुसावळचे आमदार संजय सावकारे, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, जिल्हा परीषद सदस्य जयपाल भाऊ बोदडे, पंचायत समिती सदस्य प्रदीप साळुंके, विकास पाटील, राजू  माळी, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, धनंजय एदलाबादकर, शरीफ मेकॅनिकल, आरीफ ठेकेदार, निलेश मालवनकर, आश्विन कोळी, अनिस पटेल आदी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन आसीफ बागवान यांनी प्रसंगी निखील खडसे यांच्या आठवणींना उजाळा दिला.