जबाबदार राष्ट्र म्हणून भारताचा जगभरात सन्मान-निक्की हॅले

0

नवी दिल्ली-जबाबदार लोकशाही देश असल्याने आण्विक राष्ट्र असलेल्या भारताचा जागतिक स्तरावर नेहमीच सन्मान केला जातो. त्यामुळेच अमेरिकेचाही त्यांच्या अणू पुरवठादार गटातील सदस्यत्यावाला पाठिंबा आहे, अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी संयुक्त राष्ट्रांत बोलताना भारताबाबत हे गौरवोद्गार काढले आहेत.

दहशतवादाला विरोध

उत्तर कोरियाकडून अनेक काळापासून आण्विक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच इराणमध्ये धार्मिक हुकूमशाही असून त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमांमुळे आपल्या सर्वांनाच धोका आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोदींच्या दूरदृष्टीवर विश्वास आहे. त्यामुळे दहशतवाद आणि द्वेषभावना रुजवणारी विचारसरणी संपवण्यासाठी अमेरिकाही कटीबद्ध आहे. पाकिस्तानला आम्ही आमचा सहकारी समजतो मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यांनी दहशतवादाचा स्वर्ग व्हावे, असेही हॅले यावेळी म्हणाल्या.

भारत आणि अमेरिकेमध्ये सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही देश धर्मस्वातंत्र्याला महत्व देतात. हे दोन्ही देश आपल्यातील सहिष्णू आणि आदराच्या भावनेमुळेच एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. भारतीयांनी मला नेहमीच आपल्यासारखे वागवले आहे. गव्हर्नर या नात्याने मी अमेरिकेतील माझ्या सर्व भाषणांमध्ये मी अनिवासी भारतीयांची कन्या असल्याचा उल्लेख करते. भारतीयांचे शिक्षणातील नैतिकता आणि प्रेम याचा मला अभिमान वाटतो. अमेरिकेतील अनिवासी भारतीय हे आज सर्वाधिक शिक्षित आणि अधिक परोपरकारी अल्पसंख्यांक लोक आहेत, अशा शब्दांत त्यांनी भारतीयांची स्तुती केली.