निंभोर्‍यात दोन घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

0

भुसावळ:- तालुक्यातील निंभोरा बु.॥ येथे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. गावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर धाडसी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. गावातील राहुल विजय सपकाळे हे नातेवाईकांच्या लग्नाला कुटुंबासह गेल्याने घराला कुलूप होते.

चोरट्यांनी संधी साधत बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळे सोन्याचे दागिने लांबवले तर गावातीलच विकास पितांबर पाटील हे घराच्या गच्चीवर झोपले असताना त्यांच्या घरातील 15 हजारांच्या रोकडसह पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरट्यांनी लांबवली. सोमवारी पहाटे चोरीचा उलगडा झाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याचे दुपारपर्यंत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.