अर्थमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद

0

चेन्नई: सध्या उद्योगजगतात मोठ्या प्रमाणात मंदी सुरु आहे. वाहन उद्योगासह सगळ्याच उद्योगांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान याबाबत चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील नामांकित उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांना बोलविले आहे. अर्थमंत्र्यांसोबत उद्योजकांची बैठक सुरु आहे. मंदीतून कसे बाहेर पडता येईल?, काय करावे लागेल? यावर चर्चा होणार आहे.

वाहन उद्योगातील मंदीबाबत काल अर्थमंत्र्यांनी विधान केले होते. ओला, उबेर वापरण्याची लोकांची मानसिकता असल्याने वाहन उद्योगात मंदी असल्याचे सीतारामन यांनी काल सांगितले होते.