गाजावाजा न करता नितेश राणेंचा भाजपात प्रवेश !

0

मुंबई: नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. अखेर नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी आज कोणताही गाजावाजा न करता भाजपात प्रवेश केला आहे. कणकवलीतील भाजपा कार्यालयात जाऊन प्रवेश केला आहे. भाजपा कार्यलयात जाऊन नितेश राणे यांनी भाजप सदस्यत्वाची नोंदणी केली. यावेळी भाजपातील कोणताही बडा नेता उपस्थित नव्हता.

राणे कुटुंबियांच्या भाजपा प्रवेशाला शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांचा विरोध होता आणि कायम आहे. त्यामुळेच आजपर्यंत राणे कुटुंबियांचा भाजप प्रवेश रखडला होता. अखेर नितेश राणेंनी भाजपात प्रवेश केला आहे.