पुणे: शांतीसेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे ऊर्जास्रोत पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग संलग्नित आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी आरंभीत भारत सरकार वतिने मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ मणीभाई जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या वेळी पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्र सेवा पुरस्कार, समर्पित भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा व मार्गदर्शन तसेच स्व खासदार गिरीषजी बापट ह्यांना श्रध्दांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव चे सन्माननीय विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील, प्रमुख पाहुणे आमदार सुरेश तथा राजु मामा भोळे जळगाव, डॉ संजय कोलते आय ए एस मुख्यकार्यकारी संचालक स्मार्ट सिटी पुणे, प्रसाद नंदलाल चौधरी जिएस्टी टॅक्स असी कमिशनर,संजय देशमुख अध्यक्ष अ भा लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ, अनुव्रतश्री डॉ ललिता जोगड , निनाभाऊ खर्चे अध्यक्ष पी ची लेवा पाटीदार संघ, श्री डीके देशमुख सचिव भ्रातृमंडळ बुलडाणा, यतीन ढाके मुख्य संपादक दै जनशक्ती, श्याम पाटील संपादक लेवा जगत, डॉ अशोक के पाटील उपाध्यक्ष डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान, डॉ आदिती कराड मुख्य संचालिका विस्वराज हॉस्पिटल प्रतीक गंगणे पत्रकार पुणे व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.ह्या वेळी राज्य राष्ट्रीय पातळीवर पद्मश्री डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर गुंजन टॉकीज जवळ येरवडा पुणे येथे दिनांक २७एप्रिल रोजी गुरूवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहेअसेआयोजक निमंत्रक,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार अपंगसेवक उरुळी कांचन ह्यांनी प्रातिनिधिजवळ कळविले आहे.