बेस्टच्या गाड्यांच्या लिलावात एकही लिलाव दार येत नाही

0

मुंबई – गेल्या अनेक वर्षापासून संकटात प्रवास करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘नवसंजीवनी’ देण्याचे पालिका आणि बेस्ट उपक्रमाने जोरात प्रयत्न सुरू केले आहेत तशी तयारीही सुरू केली आहे बेस्टच्या ताफ्याती एसी बसगाड्यांचा ताफा कायमस्वरुपी मोडीत काढण्याचा विचार केला आहे पण या गाड्यांना लिलाव दारही भाव‘ देत नसून जवळही कोण येत नाही अशी अवस्था झाली असल्याने बेस्ट उपक्रम चांगलाच बुचकळ्यात सापडला आहे कोण ठेकेदार बेस्टच्या लिलावाला भाव देत नसल्याने बेस्ट दुसरा कुठला उपाय आहे का याचा शोध घेत आहे

बेस्ट ही मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जात असून कमी दरात सुमारे 45 लाख प्रवासाना दररोज सेवा देत आहे मात्र ही सेवा देत असताना आपले नुकसान करून सेवा देत आहे गेल्या अनेक वर्षापासून तोटयात चालत असणा-या बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिका आणि बेस्ट उपक्रम आता पुढे सरसावले आहेत त्यानुसार बेस्टची सेवा सुधारण्यासाठी मुंबई पालिकेच्या सहकार्याची नितांत गरज असल्याने नविन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना २७ मार्च रोजी पत्र लिहून तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात दर्शवल्यानुसार उपक्रमाला होणा-या सुमारे ५९० कोटी रुपये आर्थिक तोट्याची प्रतिपूर्ती महापालिकेने करावी, उपक्रमाने विविध संस्थांकडून मोठ्या व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पालिकेने बेस्ट उपक्रमाकडे विनाव्याजी एक हजार कोटींची ठेव दीर्घ पल्ल्याच्या कालावधीसाठी देणे आणि ठेवीचा परतावा उपक्रमाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यानंतर उपक्रमाकडून पालिकेला करण्यात येईल आणि बेस्ट उपक्रमाने पालिकेकडून एक हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. हे कर्ज व्याजासह परत करण्यात येत असून, आत्तापर्यंत कर्जाचे संपूर्ण हप्ते उपक्रमाने नियमितपणे भरलेले आहेत. यापैकी सद्यस्थितीत अंदाजे ७०० कोटींचे कर्ज अद्याप शिल्लक असून हे कर्ज पालिकेने बेस्ट उपक्रमाकडे आपली भाडवली गुंतवणूक म्हणून परावर्तीत करावे, अशा मागण्या कोकीळ यांना महापौरांकडे केल्या आहेत मात्र त्यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही. गेल्या आठवड्यात महापौैरांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत बेस्टला वाचवण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून कृती आराखडा मांडण्यात आला होता. ‘उपक्रमातील कर्मचारी आणि अधिकाºयांच्या विविध भत्त्यांवरही तात्पुरती ‘गदा’ आणण्याचा तसेच एसी बसगाड्यांचा ताफादेखील कायमचा बंद करण्याची चर्चा सुरु झाली आहे. बेस्टच्या सध्याच्या बस भाड्यात दोन रुपयांनी वाढ करावी, असाही प्रस्ताव आहे.

मात्र एसी बसगाड्यांचा ताफाही कायमचा बंद करण्याची चर्चा सुरु असली, तरी मोडीतील ‘एसी’ बस घेण्यासाठी लिलावदार मात्र कोण पुढे येत नाही बेस्ट उपक्रमाला अपेक्षित किंमत देण्यासाठी एकही लिलावदार तयार होत नाही, याकडे बेस्टच्या परिवहन विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष वेधले. बेस्टच्या ताफ्यात एसी बसगाड्या २००७ या वर्षी आल्या. पण बेस्टच्या अवस्थेमुळे त्यातून प्रवास करणे लोकांनी नापंसत केले आहे. परिणामी गेल्या पाच सहा वर्षांत उपक्रमाला ६०० ते ७०० कोटी रुपयांचा आर्थिक मोठा फटका बसला आहे. हा तोटा वर्षाला ८२ कोटी रुपयांचा आहे. हा वाढता संचित तोटा सहन करणे बेस्टला आता शक्य नाही बेस्टला आवाक्याबाहेरचे झाले आहे. यासाठी बेस्टने २ फेब्रुवारी रोजी ५० एसी बसगाड्यांच्या लिलावाचा निर्णय घेतला. त्यासाठी बेस्टन वृत्तपत्रांमध्ये लिलाव नोटीसही दिली होती. उपक्रमाच्या सामुग्री व्यवस्थापन विभागाने (एमएमडी) ही नोटीस दिली होती. लिलावातून प्रत्येक बसमागे उपक्रमाला ठराविक रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र लिलाव सुरु झाल्यानंतर बोली सुरु होताच, त्यावेळी उपस्थित असलेल्या लिलावदारांची ‘बोलतीच बंद झाली बेस्टला अपेक्षित असलेले मुल्य एकही लिलावदार देण्यासाठी तयार नाही लिलावदारांनी एकाही एसी बसला ‘भाव न दिल्यामुळे’त्या दिवशीचा लिलाव झाला नाही, असे आतापर्यंत दोन लिलाव काढण्यात आले मात्र एकाही लिलाव दाराने भाव दिला नाही बेस्टच्या लिलावाला ठेकेदार भाव देत नसल्याने बेस्ट उपक्रम चांगलच बुचकळ्यात सापडला आहे

काय तरी उपाय निघेल – बेस्ट महाव्यवस्थापक जगदीश पाटील

आतापर्यंत दोन लिलाव काढण्यात आले पण लिलावदारानी बेस्टला अपेक्षित असा भाव दिला नाही बेस्टला अपेक्षित भाव मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे दुसरा काय पयाॅय आहे या शोधात बेस्ट आहे काही तरी पयाॅय निघेल दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात एकाही लिलावदाराने ५० बेस्टसाठी अपेक्षित रक्कम दिली नाही. यामुळे या लिलावातून काहीच साध्य झाले नाही. एसी बसच्या लिलावाची चर्चा सुरु असली तरी पुढील लिलाव जाहीर करण्याआधी काही अटी/शर्तींमध्ये बदल करावे लागतील का आदी मुद्यांवर चर्चा करण्यात येईल. तसे नियोजन करण्यात येईल. मग पाहू पुढच्या लिलावात काय होते ते, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदिश पाटील यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना दिली