उस्मानाबाद : रमेश कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेलं नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या उस्मानाबादमध्ये सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होत्या. रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांस आव्हान देणारे धस यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला डावलल्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फटका सोसावा लागणार आहे. कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेलं नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपातर्फे सुरेश धस यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवारी सुरेश धस, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी दलाल
राष्ट्रवादी पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही. आता पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा अजित पवार पक्ष चालवत नसून, तोडपाणी करणार्या दलालांच्या हातात पक्षाची सूत्रं गेली आहेत, अशा शब्दात माजी मंत्री सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली.