एसटी भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नाही-रावते

0

औरंगाबाद : एसटी महामंडळास दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून दररोज होणारी डिझेलवाढ, कामगारांचा पगार, चांगल्या सुविधा देण्याचा अतिरिक्त भार यामुळे आता एसटी भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. जून मध्ये याबाबत निर्णय घेणार असून दररोजची डिझेल भाडेवाढ व एसटीचे तिकीट यांचा मेळ बसत नसून आता ही भाडेवाढ अटळ असल्याचे रावते म्हणाले. औरंगाबाद येथे एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या बागेचे लोकार्पण रावते यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.

डीझेलच्या दारात वाढ 

एसटीचा दोन हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. त्यातच कामगारांच्या वेतन कराराचा मोठा भार पडणार आहे. अशा परिस्थितीत तिकीट दरवाढ केल्याशिवाय एसटीला सध्या पर्याय नाही असे दिवाकर रावते यांनी सांगितले. डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात येणार येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी दिली. सध्या डिझेलची सतत दरवाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांत डिझेल दरवाढीने एसटी महामंडळाला कोट्यवधींचा अतिरिक्त फटका बसला. आज पुन्हा पैशांनी डिझेल वाढले आहे. त्यामुळे आता तिकीट दरवाढ केल्याशिवाय एसटीला पर्याय नाही असे रावते म्हणाले.