मुंबई- सुशांतसिंह राजपूत आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला केदारनाथ या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्या या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
केदारनाथ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गढवाल येथील स्वामी दर्शन भारती यांनी उत्तराखंड हायकोर्टात केली होती. यावर कोर्टाने भारती यांनी रुद्रप्रयागच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली तक्रार घेऊन जावं असा सल्ला दिला होता.