काश्मीर प्रश्नावर ट्रम्प यांच्यासोबत कुठलीही चर्चा नाही: परराष्ट्र व्यवहार मंत्री

0

नवी दिल्ली: ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी केलेल्या वक्तव्याने भारतातील राजकारणाचा पारा तापला आहे. या प्रश्नी लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद होतांना दिसत आहे. काश्मीर प्रश्नी कोणाच्याही मध्यस्थीचा प्रश्नच येत नाही, तसे करणे हे शिमला कराराच्या विरोधात आहे, असे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. तसेच एस. जयशंकर जी (परराष्ट्र व्यवहार मंत्री) यांनी सांगितले की, काश्मीर प्रकरणांवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व पीएम मोदी यांच्या भेटी दरम्यान चर्चा झाली नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. इमरान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान इमरान खान यांनी ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नी मध्यस्ती करण्याची विनंती केली होती. ट्रम्प यांनी या विषयी इमरान खान यांना सांगितले की, काश्मीर प्रश्नी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्ती करण्याचे सांगीतले होते.