रसायन शास्त्रातील नोबेलची घोषणा; तीन शास्त्रज्ञ ठरले मानकरी !

0

स्विडन : विविध क्षेत्रातील संशोधनासाठी दोन दिवसांपासून नोबेल पुरस्कारांच्या घोषणा केल्या जात आहेत. रॉयल स्विडिश अकॅडमीकडून आज बुधवारी रसायन शास्त्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार अमेरिका, ब्रिटन आणि जपानमधील तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात येणार आहे. जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो अशी या तीन शास्त्रज्ञांना लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनासाठी नोबेल देण्यात येणार आहे.

लिथिअम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरांच्या विश्वात क्रांती झाली आहे. या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा छोट्या स्वरुपात साठवून ठेवता येते. या बॅटरीच्या संशोधनामुळे कार, लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे पोर्टेबल झाली आहेत.

९ लाख १८ हजार अमेरिकन डॉलर, एक गोल्ड मेडल असे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे स्वरुप आहे. १० डिसेंबर रोजी नॉर्वेतील स्टॉकहोम आणि ओस्लो येथे हे नोबेल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.