नोबेल विजेते साहित्यिक विद्याधर नायपॉल कालवश!

0

लंडन-‘अ बेन्ड इन दि रिव्हर’ आणि ‘अ हाऊस फॉर मिस्टर’ बिस्वास यांसारख्या कादंबऱ्या लिहिणारे नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांचे काळ लंडन येथे राहत्या घरी ८५ व्या वर्षी निधन झाले.

१७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे जन्मलेल्या नायपॉल यांच्या रचनांमध्ये त्रिनिदादपासून लंडनपर्यंतचा प्रवास आणि विविध देशांतील प्रवासाचा प्रभाव जाणवतो. त्यांना २००१ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात नायपॉल यांनी ज्या रचना केल्या, त्यामुळे त्यांना २०व्या शतकातील महान लेखकांच्या यादीत गणले जात होते. नायपॉल यांनी लिहीलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’, ‘दि इनिग्मा ऑफ अराव्हल’, ‘फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबऱ्यांमध्ये विकसनशील देशांतील प्रत्येक नागिरकाचा संघर्ष पहायला मिळतो.

नायपॉल यांच्या वंशजांना वेस्टइंडिजमध्ये भारतातून जबरदस्तीने मजुरीसाठी आणण्यात आले होते. त्यांचे वडिलही एक कादंबरीकार होते. नायपॉल यांना लवकरात लवकर त्रिनिदाद सोडण्याची इच्छा होती. त्यानंतर अनेक मुलाखतीत त्यांनी आपण त्रिनिदादला आपल्या ओळखीपासून कायमच दूर ठेवल्याचे त्यांनी सांगितले आहे.