दक्षिण कोरिया- सहा महिन्यांपूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी आता युद्ध टाळण्यासाठी अण्वस्त्र नष्ट करण्याचा निर्धार केला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे 9 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे 5 वाजता) उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग-उन यांनी दक्षिण कोरियात प्रवेश केला. त्यावेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रध्यक्ष मून जे-इन त्यांच्या स्वागतासाठी सीमेवर उभे होते. सीमेजवळच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी कोरिया द्विपकल्पात शांतात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं.
1953 साली दोन्ही कोरियांमधलं युद्ध संपलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधलं वैर दिवसेंदिवस वाढतंच गेले. गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेत अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियावर हल्ले करण्याची भाषा केली होती. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरिया बेचिराख करून, असं ट्वीट केल आहे. त्यांनी ट्वीटरमध्ये आता यापुढे थांबणार असे सांगितले आहे.
आजच्या चर्चेतून हे स्पष्ट नाही होऊ शकलं की आण्विक निःशस्त्रीकरण कोणत्या पद्धतीने आणि कधीपर्यंत केलं जाईल. यापूर्वीही असे निर्धार व्यक्त केले होते, पण वास्तवात काही घडलं नव्हतं, त्यामुळे अनेक जाणकार साशंक आहेत. दक्षिण कोरियाला अमेरिकेने दिलेलं सुरक्षाकवच आणि दक्षिण कोरियातली अमेरिकन सैनिकांची उपस्थिती यांना उत्तर कोरियाने यापूर्वीही आक्षेप घेतला आहे. शुक्रवारच्या बैठकीनंतर किम म्हणाले की “दुर्दैवी इतिहासाची” पुनरावृत्ती टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. “चर्चेत अनेक अडचणी येतील, पण वेदनेशिवाय विजय मिळत नाही,” असंही ते म्हणाले.