उत्तर भारताला धुळीचा तडाखा

0

नवी दिल्ली :- गेल्या चार-पाच दिवसापासून हवामान खात्याने तेरा राज्य व दोन केंद्रशासित प्रदेशात मोठे वादळ येण्याची शक्यता वर्तवली होती. त्यातच सोमवारी मध्यरात्री दिल्ली, हरयाणा, राजस्थानसह उत्तर भारताला धुळीच्या वादळाचा तडाखा बसला आहे. या वादळात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे वाहतुकीला फटका बसला. या वादळासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. दिल्ली सरकारकडून नागरिकांना वादळाच्या काळात घराबाहेर पडू नये, असे सूचित करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार पंजाब, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरााम, त्रिपूरा, बिहार, मध्य प्रदेशमधील पश्चिमेकडचा भाग, उत्तर प्रदेशमधील पूर्वेकडील भाग, पूर्व राजस्थान, कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू आणि केरळ याा राज्यांमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पाच राज्यांमध्ये आलेल्या धुळीच्या वादळात १२४ जण ठार झाले होते. तर ३०० जण जखमी झाले होते.