आजपासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ झाले ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ विद्यापीठ

0

जळगाव- आज ११ ऑगस्टपासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ अशी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या नामविस्तारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते मात्र ते उपस्थित राहू शकले नसल्यामुळे हा आनंद सोहळा मात्र रद्द करण्यात आला आहे. विद्यापीठाला शुक्रवारी नामविस्ताराची अधिसूचना प्राप्त झाली आहे. त्यानुसार आज नामविस्तार करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नावात बदल करण्यात आले असून ते ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ असे करण्यात आले आहे.

जुलै महिन्यात नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ असा नामविस्तार करण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले होते. ११ आॅगस्ट रोजी हा नामविस्तार करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अधिवेशनाच्या काळात केली होती. दरम्यान नामविस्ताराचा आनंद सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपलब्ध तारखेनुसार लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती कुलसचिव भ.भा.पाटील यांनी दिली.