मुंबई: विधानसभेसाठी यंदा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे विनोद तावडे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत विनोद तावडे यांनी माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने मला उमेदवारी दिली नसली तरी पक्षासाठी जोमाने काम करणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. पण माझे काय चुकले याबाबत पक्षाचे नेते अमित शहा, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाच वर्षे मंत्री होतो माझ्यावर एकही भ्रष्ट्राचाराचे आरोप नाही तरीही उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे माझे काय चुकले याबाबत पक्षाला विचारणा करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
संघ, विद्यार्थी परिषदेतून घडलो असल्याने आता पक्षासाठी काम करणार आहे. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम, पक्ष दुसऱ्या स्थानी आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहील, या निवडणुकीत पक्षाला बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल तावडे यांनी सांगितले.