माजी खासदार प्रिया दत्त आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही

0

मुंबई-आगामी २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी जाहीर केले आहे. उत्तर-मध्य मुंबईमधून त्या दोन वेळेस खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या. २०१४च्या निवडणुकीत भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला.

राजकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना ओढाताण होत असल्याने आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रिया दत्ता यांनी आता निवडणुकीत माघार घेतल्यानंतर काँग्रेस या जागेवरून कोणाला उमेदवारी देणार आहे, याकडे सर्वांच्या लक्ष लागून आहे. निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पत्रकातून दत्त यांनी राहूल गांधी यांच्यासह, मतदारसंघातील नागरिक आणि माध्यमांचेही आभार मानले आहेत.