मोदींविरोधात प्रियांका गांधी लढणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम; हे आहेत कॉंग्रेसचे उमेदवार !

0

वाराणसी: गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्यांच्यावर महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्याकडे आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून प्रियांका गांधी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी दिली असून अजय राय हे २०१४ मध्येही मोदींविरोधात रिंगणात उतरले होते.