सुषमा स्वराज यांचा आता थांबण्याचा निर्णय; २०१९ ची निवडणूक लढविणार नाही

0

इंदूर- केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज इंदूर येथे आपल्या प्रकृती स्वास्थ्याचे कारण देत ही घोषणा केली.

भाजपाच्या प्रचारासाठी मध्य प्रदेश येथे आलेल्या सुषमा स्वराज पत्रकार परिषदेत बोलत होत्या. आपल्या धारदार वक्तृवासाठी प्रसिद्ध असलेल्या सुषमा स्वराज या भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. दरम्यान, सुषमा स्वराज यांच्यावर २०१६ मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी दीर्घकाळ उपचार घेतले. आपल्या मंत्रालयातील कामांवरुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवरच्या जनतेच्या समस्यांची दखल घेऊन त्यांना मदत करण्यास त्या नेहमी पुढे असतात. यासाठी त्यांचे मोठे कौतुकही होते.