ममता बॅनर्जी सरकारला दिलासा; भाजपच्या रथयात्रेवर पुन्हा बंदी !

0

कोलकत्ता-पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रेला उच्च न्यायालयाने पुन्हा बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बेंचने आज ममता बॅनर्जी सरकारला दिलासा दिला आहे. कालच कोलकत्ता उच्च न्यायालयाने भाजपच्या रथयात्रेला परवानगी दिली होती. याला आव्हान देत ममता बॅनर्जी सरकारने फेरविचार याचिका दाखल केली होती.

भाजप पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार आहे. या रथयात्रेला सुरुवातीला परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर भाजपने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर परवानगी दिली होती. पुन्हा ही परवानगी नाकारण्यात आली आहे.