नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सोपविला आहे. पक्षाने दुसरा अध्यक्ष शोधावा असेही त्यांनी सूचित केले होते. दरम्यान पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आग्रही आहे. परंतु राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असून गांधी कुटुंबा व्यतिरिक्त दुसरा अध्यक्ष व्हावा अशी भूमिका स्पष्ट केली आहे. आज कॉंग्रेस खासदारांची बैठक झाली त्यात राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून आले.
राहुल गांधी हे अध्यक्ष राहावे यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज राहुल गांधी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले.