बंगळूर-सिद्धरामय्या यांनी भाजपाच्या या तीनही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. माफी मागा किंवा १०० कोटींची नुकसान भरपाई द्या अशा आशयाची नोटीस सिद्धरामय्या यांनी पाठविली आहे. कर्नाटकात पाच दिवसांनंतर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भाजपाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत.
आपल्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, आता हेच आरोप त्यांच्या अंगलट आले आहेत. कारण, सिद्धरामय्या यांनी भाजपाच्या या तीनही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. माफी मागा किंवा १०० कोटींची नुकसान भरपाई द्या असे सिद्धरामय्या यांनी नोटिशीत म्हटले आहे.
Karnataka Chief Minister Siddaramaiah sends legal notice for criminal and civil defamation to BJP, Narendra Modi, Amit Shah and BS Yeddyurappa, over BJP’s corruption charges against him.
— ANI (@ANI) May 7, 2018