नोव्हेंबरमध्ये दिपिका, रणवीरचे होणार लग्न

0

पुणे- बॉलीवूडमधील नामांकित जोडी म्हणून ओळखली जाणारी, बाजीराव मस्तानीची जोडी असलेली रणवीर सिंह व दिपिका पदुकोन यांच्या प्रेम संबंधाबद्दल सर्वांना माहित आहे. गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही रिलेशनशीप आहे. ते दोघही लग्न करणार असल्याचे बोलले जाते. दोघांच्या कुटुंबियांना देखील याबाबत कल्पना आहे. दरम्यान दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तारीख निश्चित केल्याचे बोलले जात आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दोन्ही लग्न बेडीत अडकणार आहे.

रणवीर आणि दीपिकाचे कुटुंबीय एकमेकांना भेटत होते आणि त्यांच्यात लग्नाचे नियोजन देखील सुरु आहे. मेक-अप आर्टिस्टकडून आणि पब्लिकिस्ट्सची लग्नासाठी ऑर्डर बाबत विनंती करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “रणवीर आणि दीपिका दोघेही अत्यंत खाजगी आहेत. लांबच्या मेजवानी दोघांनाही पसंत नाही. परतू कौटुंबिक आणि जवळच्या मित्रांना लग्नात आमंत्रित केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. भारताबाहेर लग्न सोहळा होणार आहे. भारतात दोन रिसेप्शनही नियोजित आहेत. त्यापैकी एक निश्चितपणे मुंबईत असणार आहे, हे ठिकाण निश्चित केले जात आहे.