मुंबई: राज्य सरकार व केंद्र सरकार समाजातील प्रत्येक घटकांसाठी कोणती ना कोणती योजना राबवत असते. मुलींसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिकावे यासाठी सरकार देखील मदत करत आहे. अनेक मुली घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाही आणि अर्ध्या मध्येचं शिक्षण सोडून द्यावे लागते.
मात्र, मुलींना शिक्षण पूर्ण करता येणार आहे. आपल्या गावात 12वी पर्यंत शिक्षणाची सोय नसते. यासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिकायला जावे लागते. यासाठी तुम्हाला एसटी बसमध्ये जावे लागते किंवा सायकलवर प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातील मुलींसाठी मोफत प्रवास सवलत पास देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आजपर्यंत ही सुविधा 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी होती. मात्र, आता ही सुविधा 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अन्य सामाजिक- आर्थिक वर्गांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. या सवलतीचा फायदा राज्यातील सुमारे 2 कोटी 18 लाख जनतेला फायदा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनेमध्ये बदल करण्यात आले आहे. नवनवीन उपक्रम देखील राबवत आहे. राज्य सरकार एसटी प्रवासात विविध योजना राबवून प्रवाशांना सवलत देत आहे. आता शाळेतील मुलींना शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी सरकार मुलींना मोफत प्रवास देत आहे सध्या, ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या मुलींना या योजनेअंतर्गत मोफत एसटी प्रवासासाठी पात्र आहेत. ही सवलत बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना देखील उपलब्ध होणार आहे. यामुळे 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रवासासाठी एक रुपया खर्च देखील करावा लागणार नाही. मुलींना मोफत प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल याबाबत जाणून घेऊया.
मोफत प्रवासाचा असा घ्या लाभ
मुलगी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून खरा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, एसटी महामंडळ आगारातून पूर्णपणे विनामूल्य प्रवास पास जारी करते. सर्व मुलींची यादी शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या एका शिक्षकामार्फत आगर प्रमुखांना देतील. त्यांच्या शैक्षणिक नोंदींच पुनरावलोकन केल्यानंतर, त्या सर्व
कामार्फत आगर प्रमुखांना देतील. त्यांच्याशैक्षणिक नोंदींचे पुनरावलोकन केल्यानंतर, त्या सर्व महिलांना एसटीचे मोफत प्रवास पास दिले जातील. ही योजना मुलींसाठी लाभदायक ठरत आहे. या योजनेचा लाभ घेऊन मुली आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. ही योजना मुलींना माहित व्हावी यासाठी आपण ही माहिती पुढे नक्की पाठवा.