मुंबई : राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ओमेर्ता’मधील एका न्यूड सीनला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर हंसल मेहता दिग्दर्शित हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. हंसल मेहतांनी चित्रपटात काटछाट न करण्याची विनंती सेन्सॉर बोर्डाला केली होती, पण त्यामधील न्यूड सीन बोर्डाने हटवलाच. “सिनेमात एक सीन होता, ज्यात राजकुमारला समोरुन न्यूड दाखवण्यात आले होते.
ओमेर्ता’ हा चित्रपट अहमद उमर सईद शेख यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात राजकुमार रावने पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटीश दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट एका दहशतवाद्याच्या मनाची स्थिती, घालमेल दाखवतो. आधी हा सिनेमा 20 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण सेन्सॉर बोर्डाकडून उशिरा ग्रीन सिग्नल मिळाल्याने आता हा चित्रपट 4 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.