जळगाव :-नूतन मराठा महाविद्यालय हे मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर असून प्रशिक विदयर्थी संघटनेची स्थापना याच महाविद्यालयात झाली आहे , सत्यशोधक समाज ही चळवळ सुद्धा याच महाविद्यालयातुन चालत असे , राज्यस्तरीय सत्यशोधकि साहित्य संमेलन यशस्वी करण्यात तसेच मागास व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना फक्त दहा रूपयात प्रवेश देवून एक नवी ओळख निर्माण केली असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .
नूतन मराठा महाविद्यालयातिल माजी विदयर्थी मेळावा ३० जुलै रोजी प्राचार्य डॉ. पी. एल. देशमुख यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला असता वाघ बोलत होते .
या प्रसंगी अनिल पाटील , प्रा. सुनील गरुड़ , जयप्रकाश महाडिक , पल्लवी शिंपी , कांचन धांडे , विकास पवार , शशिकांत शिंदे यांचीही भाषणे झाली .
डॉ. राजू पाटील , प्रा. डॉ. डी. आर. चव्हाण , प्रा. प्रवीण शिंदे , प्रा. डॉ. नितिन बाविस्कर , प्रा. डॉ. इंदिरा पाटील , मंगेश सालुंके , साजिद शेख , हर्षल पाटील आदि मान्यवर मंचावर हजर होती .
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. पी. एल. देशमुख यांनी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेवून पुढं मंत्री , आमदार , कुलगुरु , विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष , निष्णात वकील , न्यायाधीश झाले हे आम्हास गौरवास्पद आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख , आभार प्रदर्शन प्रवीण शिंदे यांनी केले .