ओडिशा l
ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
बालासोर जिल्ह्यातील अपघातस्थळी माध्यमांशी बोलताना वैष्णव म्हणाले, ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण आणि त्याला जबाबदार असलेल्या दोषींची ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि पॉइंट मशीनमध्ये केलेल्या बदलांमुळे हा अपघात झाला. आम्ही कोणतीही शक्यता नाकारली नाही. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चौकशी पूर्ण केली असून अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.