निगडी : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही भांडणे बौद्धनगर निगडी येथे सोमवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास झाली. आदर्श मरगळ (वय 19, रा. ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लखन कांबळे, अक्षय गायकवाड, संघपाल मांजरे, नागेश (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श आणि अक्षय यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग अक्षयच्या मनात होता. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास निगडी बौध्दनगर येथील सार्वजनिक रोडवर आदर्श याला एकटे गाठून क्षयने आपल्या साथीदारांना एकत्र आणून मारहाण केली. चौघांनी मिळून आदर्शला दगडाने मारले. यामध्ये आदर्श गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.