शारीरिक छळाच्या आरोपावरूनऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळवर गुन्हा दाखल

0

नाशिक : 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांच्यावर कथित पत्नीने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तूवर कलम 498/420 नुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही नाशिक ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. फिर्यादी महिलेच्या सांगण्यानुसार दत्तू आणि तिनं दोन वर्षांपूर्वी पुण्यात हिंदू धर्म वैदीक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर दत्तूनं तिला पुन्हा थाटामाटात लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु दोनवेळा तारीख ठरवूनही दत्तू लग्नाला हजर राहिला नाही आणि त्यानंतर त्यानं संबंध तोडण्यास सांगितल्याचा दावा महिलेने केला. या दोन वर्षांत दत्तूनं मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोपही महिलेने केला.