ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंग कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात !

0

नवी दिल्ली: भारतीय बॉक्सर खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंग कॉंग्रेसकडून दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. याबाबत त्याने स्वत:हून ट्वीट करत याची माहिती दिली आहे. बॉक्सर विजेंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

‘भाजपासाठी 2014 मध्ये मिळालेला विजय सर्वात मोठा होता’, असे विजेंदर सिंग यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, 15 ते 20 लाख रुपये असेही गरिबांच्या खात्यात येतील. माझ्याकडे अजूनही तो युट्यूब व्हिडीओ आहे. ते खोटे होते. लोकांनी आणि खासकरुन गरिबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांचा विश्वासघात मोदींनी केला असे आरोप विजेंदर सिंगने केले आहे.