किनगाव ग्राम पंचायतच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने महीलांचा करण्यात आले सन्मान

 यावल प्रतिनिधी l

तालुक्यातील किनगाव बु॥ ग्रामपंचायतच्या वतीने

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव सन्मान करण्यात आले . यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूक ग्राम पंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहील्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे सरपंच निर्मला पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण पुजन करण्यात आले ,यावेळी कार्यक्रमात गावातील सामाजीक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व सन्मान ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आला यात माजी जिल्हा परिषद सदस्या रत्नाताई चंन्द्रकांत चौधरी माजी ग्राम पंचायत सदस्या मदिना गुलशेर तडवी,सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मायावती अरुण बियाणी, अश्विनी मनीष पाटील, कोकीळाबाई गोकुळ पाटील,नलिनी एकनाथ साळुंके, आशाबाई साहेबराव हिवराळे व सरुबाई धोंडू हिवराळे या महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी मायावती बियाणी यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची आठवन करत कविताही गायण केली तर अश्विनी पाटील यांनी ग्राम पंचायत कार्यालयाने केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निर्मला पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील रेखाताई सचिन नायदे या होत्या यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्यांनसह ग्रामस्थ व महिला उपस्थीत होते.