मराठवाडा जनविकास परिषद ठाणेच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन
मराठवाडा जनविकास परिषद ठाणेच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांसमवेत उपस्थित राहिलो.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास घराघरात व पुढील प्रत्येक पिढीस ज्ञात असावा, यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले तर श्री.कैलास जाधव (प्रशासकीय क्षेत्र), सोमनाथ वाळके (शैक्षणिक क्षेत्र), कर्ण एकनाथ तांबे (सामाजिक क्षेत्र), मिलिंद शिंदे (कला क्षेत्र), सोनाली मात्रे (प्रशासकीय क्षेत्र), आत्माराम सोनवणे (सामाजिक क्षेत्र) यांना मराठवाडा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेबांना मराठवड्याने नेहमीच पाठिंबा व प्रेम दिले आहे. त्यांनीही मराठवड्यास आजवर खूप काही दिले आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती संभाजी नगर येथे नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा भरघोस निधी दिल्याबद्दल ठाण्यात जाऊन आभार मानायचा योग आज आला. स्व.आनंद दिघे साहेबांच्या कार्याचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री महोदय राज्यात काम करत आहेत. त्यांचा सहकारी या नात्याने कार्यक्रमापेक्षा कामावर अधिक वेळ देणारे नेते म्हणून त्यांची ओळख अधिक प्रखर होत चालली आहे, याचा आनंद वाटतो.
ठाणे व परिसरात राहणाऱ्या मराठवाड्यातील जनतेने मराठवाडा भवन उभारणीच्या केलेल्या मागणीस मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मान्यता देण्याचे यावेळी घोषित केले, त्याबद्दलही आभार.
मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना मराठवाडा जनविकास परिषदेचे अण्णासाहेब टेकाळे यांनी सुचवल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी एक योजना प्रस्तावित केली होती, त्या योजनेसही मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता देणार असल्याचे जाहीर केले आहे, त्याबद्दलही आभार!
मुंबई, ठाणे आदी शहरी भागात राहणाऱ्या मराठवाड्यातील जनतेला एकत्रित करून त्यांच्यासाठी सामाजिक काम उभे करणाऱ्या मराठवाडा जनविकास परोषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, नितीन कदम, डॉ.दिलीप सपाटे, डॉ.अशोक नांदापुरकर, डॉ.अविनाश भागवत, डॉ.राजेश कुलकर्णी यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
– धनंजय मुंडे