आषाढी एकादशी निमित्त एकनाथराव खडसें तर्फे मुक्ताईच्या गाभाऱ्यात सव्वा क्विंटल खजुराची आरास

मुक्ताईनगर प्रतिनिधी….

श्री संत मुक्ताई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर मूळमंदिर येथे आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माजी मंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांच्या तर्फे आदिशक्ती मुक्ताईच्या गाभाऱ्यात त्यांच्या शेतातील बरही खजुराची
नयनरम्य आरास करण्यात आली.

आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री संत मुक्ताई मुळमंदिरात पहाटेपासूनच आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ह भ प संदीप महाराज मोतेकर यांनी मंगल काकड आरती व महापूजा केली.
जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही ते कोथळी, मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येऊन आदिशक्ती मुक्ताई च्या रूपाने भगवान श्री. पांडुरंगाचे दर्शन घेतात अशी ख्याती आहे त्यामुळे दिवसभर हजारो भाविक दर्शनाकरिता येतील असा अंदाज असल्याचे कोथळी मूळ मंदिराचे व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज यांनी सांगितले.
आज सकाळी पाऊसाची सुरुवात झाल्याने भाविक भक्तांचा दर्शनाचा आनंद द्विगुणित झाला.
यावेळी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले
यावेळी त्यांनी सांगितले सालाबादप्रमाणे आ एकनाथराव खडसे आणि सौ. मंदा ताई खडसे हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले आहेत आज आषाढी एकादशी निमित्ताने एकनाथरावजी खडसे यांच्या शेतातील सव्वा क्विंटल ताज्या बरई खजुराची आदिशक्ती मुक्ताई ला आरास करण्यात आली आहे हि नयनरम्य आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे
वारकरी बांधव हे मुख्यतः व्यवसायाने शेतकरी असुन आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पाऊसाला सुरुवात झाल्याने
भाविकांमध्ये आनंद असून आज आदिशक्ती मुक्ताई चे दर्शन घेऊन
या हंगामात पाऊसपाणी व्यवस्थित होऊन पिक पाण्याने शिवार बहरून शेतकरी बांधवांचे जिवन समृद्ध होऊ दे राज्य,बेरोजगारी, महागाई,जातीय द्वेषा पासून मुक्त होऊ दे
अशी मुक्ताई चरणी प्रार्थना केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले