भडगाव (प्रतिनिधी)
भडगाव पोलीस स्टेशनला ईद – ए – मिलाद निमित्त निघणारी २८ सप्टेंबर चा जुलुस २९ सप्टेंबर रोजी काढणार मुस्लिम बांधवांनी एक मताने व्यक्त केले सविस्तर वृत्त असे की येणाऱ्या काळात कितीतरी असे हिंदू व मुस्लिम समाजाचे सण एकत्र येत असल्याने येत्या २८ तारखेला सुद्धा मुस्लिम बांधावांचे ईद – ए – मिलाद हा सण व हिंन्दु बांधवांचे गणेश विसर्जन एकत्र असल्या कारणाने कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व दोन्ही समाज आप आपले सण आनंदाने व्यक्त व्हावे या साठी मुस्लिम समाजाने बैठकीत एक मताने असे निर्णय घेतले की ईद – ए – मिलाद चा जो जुलुस ( मिरवणुक ) ही २८ तारखेला न काढता २९ तारखेला काढु असे या बैठकीत सांगितले या निर्णयामुळे मुस्लिम बांधवांन चे कौतुक होत आहे ही बैठक ८ सप्टेंबर संध्या 6 वाजता पोलीस मिटिंग हॉल मध्ये घेण्यात आली . मिटिग भडगाव पो.स्टे. चे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. या बैठकीत पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मुस्लिम बांधवांच्या या निर्णयां चे कौतुक केले .कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी. असे सांगितले बैठकीस भडगांव पोलिस पदाधिकारी, गोपनिय शाखेचे स्वप्निल पाटील, व विलास पाटील’ पत्रकार राजू शेख, पत्रकार जावेद शेख, हाजी बब्बु सेठ, हाजी जाकीर कुरेशी मिर्झा इलियास बेग, मिर्झा अरशद बेग, ईसाक मलीक , खालिक शेख, नाजिम सेठ भंगार वाले ,व भडगाव शहरातील सर्व मुस्लिम समाज – बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भडगाव पो. स्टे. चे पोलीस उप निरीक्षक शेखर ढोमांळे यांनी मानले.
Next Post