पिंपरी l सेकन संघर्ष समितीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराला पिक बांधून पीक नष्ट होत आहे मरत आहे म्हणून अनोख्या पद्धतीने मरण दीन साजरा करण्यात आला
संघर्ष समिती पिंपरीसेकम तालुका भुसावळ जिल्हा जळगाव आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय एन ए पी एम यांच्यावतीने 05 जून 2023 या जागतिक पर्यावरण दिन निमित्त भुसावळ तालुक्यातील शेतकरी मरण दिन साजरा करून निषेध व्यक्त केला
श्री चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले की महाजनकोने शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे येऊन 24 तास विजेची मागणी पूर्ण करायला पाहिजे 15 मे पासून सुरू केलेलं भारनियमन यामुळे हायात असलेल्या व्यापारी पिकाला पाणी मिळत नसल्यामुळे केळीचे घळ जमीन दोस्त होत आहै. कमी पाण्यामुळे सुंदर दिसणारा केळीचा घळ उन्हामुळे करपला आहे. शेतकऱ्यांच मोठ नुकसान होत आहे. म्हणून शेतकऱ्यांची मागणी रास्त असून प्रकल्प बाधित म्हणून त्यांना विशेष गरज म्हणून एक सामाजिक दायित्व म्हणून नेहमीप्रमाणे वीज पुरवठा देणे गरजेचे आहे दिपनगर प्रशासनाने दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन भविष्यात उभे केले जाईल*, पिंपरी सेकंम संघर्ष समितीचे अध्यक्ष *रमाकांत चौधरी यांनी सनदशीर मार्गाने आलेल्या शेतकऱ्यांना सोबत घेत पिकाचे घळ मुख्य प्रवेशद्वाराला बांधले अशी वेळा आम्हा शेतकऱ्यांवर येणे अतिशय दुःखाची बाब आहे प्रकल्प उभा करीत असताना शेतकऱ्याच्या नावाने शेतीची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याचे नाव पुढे केले जाते. आणि आता शेतकऱ्यांची कोणतीही दखल घेतली जात नाहीं आहे याची मोठी खंत आहे* माजी जिल्हा परिषद सदस्य प्रगतीशील शेतकरी *राजेंद्र भाऊ साहेबराव चौधरी यांनीही निषेध नोंदवला शेतीला 24 तास बीज मिळालीच पाहिजे असे सांगितले* आंदोलनात सहभाग नोंदवला प्रगतीशील शेतकरी *रवींदर सिंग चाहेल यांनी सांगितले की जवळ तापी नदीचे पाणी असून सुद्धा व्यापारी पीक विजेचां अभाव मुळे आम्ही पाणी देऊ शकत नाही पीक नष्ट होऊन आर्थिक नुकसान होत आहे*. सामूहिक पर्यावरण समितीचे *संतोष सोनवणे संतोष सोनवणे यांनीही भार नियमन रद्द व्हावे या मागणीला समर्थन* दिले व उपस्थिती दिली *इतर शेतकरी बांधव केळीचे खांब व घळ, ट्रॅक्टर घेऊनमोठ्या संख्येने उपस्थित होते*.
राज्यात मोठ्या प्रमाणावर विद्युत निर्मिती करण्यामध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचा मोठा वाटा असून याबाबत वेळोवेळी भुसावळ विद्युत केंद्राला गौरवण्यात सुद्धा आलेल आहे.मात्र गेल्या काही वर्षापासून औष्णिक विद्युत केंद्र मार्फत निर्माण होणारे पर्यावरण प्रदूषण व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले असून त्याचे निर्मूलन व उपाय योजना करण्यासाठी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र व त्याचे अधिकारी हे पूर्णपणे असमर्थ राहिलेले आहे. त्यामुळे तापी व भोगावती नदीसह पिंपरीसेकम कोठोरे बुद्रुक ,कठोरे खुर्द, फुलगाव, जाडगाव, मन्यारखेडे सह वेल्हाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे प्रदूषण होऊन त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या केळी ,ऊस, व इतर महत्त्वाची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच परिसरात शेतीसाठी 24 तास सुरू असलेली लाईट महावितरण कंपनीकडून 01 एप्रिल 2023 पासून बंद करून लोड शेडिंग सुरू करण्यात आले आहे तर महानिर्मिती नवीन प्रकल्प यांचे मार्फत आश्वासने देऊन सुद्धा परिसरातील सामाजिक दायित्व निधीची कामे पूर्ण होत नाही तसेच महावितरण कंपनीने सुरू केलेल्या लोड सेटिंग च्या विरोधात 15 मे 2023 पासून पिंपरी सेकंम परिसरातील शेतकरी यांची संघर्ष समितीच्या माध्यमातून महानिर्मिती व महावितरण यांच्यापासून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या रॉ वॉटर पंपाच्या समोर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. परंतु 20 दिवस होऊनही सुद्धा महावितरण व महानिर्मिती यांच्या अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून आपापले जबाबदारी सोयीस्करपणे काढत आहे जिल्ह्याला सरकारमध्ये दोन मंत्री लाभलेले आहे तरी एकीकडे सर्वसामान्यांचे सरकार गतिमान सरकार याची वल्गना सरकार मार्फत करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा निषेध म्हणून जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी दिनांक 5 जून 2023 रोजी सर्व संघर्ष समिती व पिंपरीसेकम गावातील शेतकरी पंचकोशीतील शेतकरी बांधव त्याचबरोबर भुसावळ तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ पिकांचे प्रतीकात्मक झाडे बांधून उदाहरणार्थ केळी चे पिक शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन केले आहे.