जागतिक आरोग्यदिनानिमित्त ‘माधवबाग’ने दिला आरोग्य मंत्र

माधवबाग क्लिनिक आयोजित 'वाकेथॉन' उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । जगभरातील कोट्यवधी लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. स्वस्थ जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्त शर्करा पातळी नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि शारीरिकदृष्ट्या कार्यरत राहणे

अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच डॉक्टर मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना व्यायाम करण्याचा सल्ला देतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना त्यांचे वजन आटोक्यात राखणे. तसेच रक्त शर्कराचा स्तर वाढू नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. यासाठी दररोज कमीतकमी ३० मिनिटे धावणे किंवा जलद चालणे गरजेचे आहे. या अनुषंगाने, जागतिक

आरोग्य दिनानिमित्त माधवबाग कार्डियाक क्लिनिक, जळगाव तर्फे विन डायबिटीज या मोहीमे अंतर्गत डायबिटीजवर नियंत्रण आणण्यासाठी चालण्याचं महत्व अधोरेखित व्हावं या करीता ३ किमी वाकेथॉनचे सकाळी ६:३० वाजता मेहरूण तलाव येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अनिता पाटील यांचेसह विद्याथ्र्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.

महापौर सौ. जयश्रीताई महाजन, डॉ श्रद्धा माळी, डॉ श्रेयस महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या वाकेथॉन रॅलीचे उदघाटन करण्यात आले. पोलीस बिनतारी संदेश विभागाचे पो.नि. फारुख तडवी, दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल दर्जी, बालविश्व स्कुल च्या संचालिका भारतीताई चौधरी, स्वामी समर्थ ग्रुपच्या संचालिका प्रतीक्षाताई पाटील, पंकज नाले, भारती ताई काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. पेहलानी ग्रुपच्या कलावंतांनी गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या वाकेथॉन रॅलीला माधवबागच्या रुग्णांसह शेकडो नागरिकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सदर वाँके थॉन, क्रीडा शिक्षक राजेश जाधव, डॉ विजय पाटील, मीनल थोरात, राजेंद्र जंजाळे, जागृती काळे, अश्विनी निकम यांचे मार्गदर्शनात पार पडली. यशस्वीतेसाठी चेतन निंबोळकर, सुरेश राजपूत, पंकज कासार, योगेश चौधरी, सागर पाटील, आनंद चौधरी, योगेश • वराडे, राहूल बोरसे यांनी परिश्रम घेतले. उज्वला वर्मा, अमित माळी यांनी सूत्रसंचालन तर अमित माळी यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.