भुसावळ l
खडका रोडवरील दारुल उलूम रजबिया नुरिया या मदरशामध्ये कंपाऊंडच्या आतल्या बाजूला पर्यावरण जागर प्रतिष्ठान हरित भुसावळ स्वच्छ भुसावळ सदस्यच्या वतीने या ठिकाणी 15 वृक्षाचे वृक्षारोपन करण्यात आले . हे वृक्ष भुसावळ नगरपरिषदेचे ब्रॅन्ड अम्बेसेडर नाना पाटील सर यांनी उपलब्ध करून दिले . या वृक्षाचे संवर्धन मदरश्या मधील असलेले प्रत्येक विद्यार्थ्याचे एक झाड संवर्धनासाठी राहणार आहे . असे मदरश्याचे प्रमुख मौलाना कमुदीन यांनी सांगितले . अजूनही 40 वृक्ष लावले जातील त्यांची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली जाईल .
या मदरश्या मध्ये पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे व हरित भुसावळ व स्वच्छ भुसावळ चे सदस्य राधेश्याम जी लाहोटी देशदुत चे संजयसिंग चव्हाण नाना पाटील सर लोकमत 18 न्युज चे इम्तियाज पत्रकार इकबाल सुरेंद्रसिग पाटील प्रताप भाऊ आपुसोफिया नंद अन्सारी नुरल हसन अन्सारी मौलाना तौसिफ रजा मौलाना फैजान रजा नूरगणी हसन या सर्व च्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले .
यावेळी मदरश्यामध्ये वृक्षारोपन केल्याने मौलाना यांना व विद्यार्थी यांना ही श्री राधेश्याम लाहोटी व नाना पाटील सर यांनी धन्यवाद दिले . व भविष्यात ही आपणास लागणारी झाडाची रोपे उपलब्ध करून देऊ असे पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी सांगितले . या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून लोकमत 18 न्युज चॅनेल चे इम्तिहाज यांनी कार्य केले .