#corona update: बाधितांसह मृतांची संख्या पुन्हा वाढली !

0

नवी दिल्ली: ऑक्टोंबरपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत होती. त्यामुळे देशात दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतातही त्याचे संकेत आहेत. दिवाळीनंतर रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत होती. नेमके तसेच होतांना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मागील २४ तासांत ४६ हजार २३२ रुग्ण आढळले. तर ५६४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.

देशातील करोनाबाधितांची संख्या शनिवारी ९० लाख ५० हजार ५९७ इतकी जाहली आहे. कोरोनातून ८४ लाख ७८ हजार रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९३.६७ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात सध्या चार लाख ३९ हजार ७४७ उपचाराधीन रुग्ण असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ४.८६ टक्के इतकी आहे. मृतांची एकूण संख्या एक लाख ३२ हजार ७२६ वर पोहोचली आहे.