आज पुन्हा पेट्रोल स्वस्त: जाणून घ्या आजचे दर !

0

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल २० पैशांनी तर डीझेल ७ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलसाठी ७४.१६ रुपये मोजावे लागणार आहे तर डिझेलचा दर ६५.१२ रुपयांवर आला आहे.

दिल्लीत पेट्रोलसाठी ६८.५० रुपये मोजावे लागणार आहे तर डिझेलसाठी ६२.२४ रुपये मोजावे लागणार आहे.