मुंबई-इंधन दरवाढ सुरुच असून मुंबईत आज सोमवारी पेट्रोल प्रति लिटरमागे १५ पैशांनी महागले. तर डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे सात पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ८९. ४४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.३३ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठलेला नीचांक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यावरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आता गणेशोत्सवातही इंधन दरवाढीचे विघ्न कायम असल्याचे दिसते.
सोमवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली. दिल्लीतही पेट्रोल १५ पैशांनी तर डिझेल सहा पैशांनी महागले.
प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.
प्रमुख शहरांमधील दर
पुणे
पेट्रोल – ८९. २२ रुपये
डिझेल – ७६. ९१ रुपये
नागपूर
पेट्रोल – ८९. ९२ रुपये
डिझेल – ७८. ८५ रुपये
औरंगाबाद
पेट्रोल – ९०. ४९ रुपये
डिझेल – ७९. ३८ रुपये
परभणी
पेट्रोल – ९१. १९ रुपये
डिझेल – ७८. ८१ रुपये