मुंबई – गेल्या तीन आठवड्यापासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात १७ पैसे तर डिझेलच्या दरात १६ पैशांनी कपात करण्यात आले आहेत. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी ८३.०७ रुपये तर प्रतिलिटर डिझेलसाठी ७५.७६ रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्लीतही पेट्रोल १७ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे राजधानीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी ७७.५६ रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी ७२.३१ रुपये मोजावे लागणार आहेत.
इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झाले आहे.